आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी सांगितले विद्यार्थांना अनुभवाचे बोल..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

के सी ई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये महिला दिनानिमित्त, जळगावच्या पहिल्या म.न.पा. आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी विद्यार्थांबरोबर अनुभवाच्या गोष्टी सांगून त्यांना स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी व्यासपीठावर आय एम आरच्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे, डिन डॉ तनुजा फेगडे, युवती सभा समन्वयक डॉ शमा सराफ आणि आय एम आरची माजी विद्यार्थीनी आणि उद्योजक मोहिनी नेवे यांची उपस्थिती होती. प्रस्तावना करतांना डॉ शमा सराफ यांनी सांगितले की, “काल बर्‍याच जणांनी प्रश्न विचारला, की महिला दिनाची आता गरज आहे का? त्यांना सांगावेसे वाटते, जोपर्यंत इथे निर्भया पथक गरजेचे आहे, मुली-महिला खरोखर निर्भय होत नाही तोपर्यंत महिला दिनाची गरज आहे.” त्यानंतर बोलताना मनापा आयुक्त डॉ विद्या गायकवाड म्हणाल्यात,” मी टार्गेट पक्के केले होते. जे केले ते मनाने केले. वेळ, शिक्षक, पुस्तके नाहित हे कधीही आभ्यास न करण्यासाठीची कारणे होऊ शकत नाही. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे मुलाखती वाचा. आभ्यास सूध्दा एन्जॉय करा. मी आजही माझ्या मुलाचे मार्क बघत नाही. तो आभ्यास आत्मसात करतो आहे की नाही हे मात्र आवर्जून बघते.

संस्कार फक्त मुलींवर नाही तर मुलांवरही झाले पाहिजे. स्वतःचे नाव मोठे करायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही. खुप वाचा आणि वाचत असतांना महत्त्वाचे ते हायलाईट करायला शिका. टॅग करायला शिका, याच गोष्टी पिक्टोरिअल मेमरीत सेव्ह होतात. जो विक पॉइंट आहे. त्याविषयाचे तर वाचन आणखी जास्त करायचे. सोमवार ते शनिवार काम केले असेल तरच रवीवार एन्जॉय करा. हे सहा दिवस काम केले नसेल तर तुम्हाला रवीवार एन्जॉय करायचा अधिकार ही नाही.

मला माझ्या भावाने घडवले, आयुष्यात एक ट्रिगरींग पाॅईंट येतो. भावाच्या सिलेक्शन कारेक्रमाला गेले होते, तिथे एक मुलगा असा आला होता की ज्याच्याकडे काहीच नव्हते फक्त मेहनत आणि जिद्द होती, तिथे एक चेतना मनात जागवली गेली याच्याकडे काहीच नसतांना हा ही गोष्ट मिळवू शकतो तर यापेक्षा माझ्याकडे बर्‍याच गोष्टी आहेत ज्यामुळे मी सुद्धा अचिव्ह करु शकते. हे तुमचे मोबाईल, काॅम्पुटर फक्त डाटा आहे. त्यावर किती अवलंबून राहायचे ते तुम्ही ठरवायला हवे.

त्यानंतर बोलताना प्रमुख पाहुण्या मोहिनी नेवे म्हणाल्यात, “आय एम आरची सीनर्जि आजही माझ्यात आहे. खेळाडूंना असल्याने आभ्यास करायचा नाही असे कधीही केले नाही. खेळ आणि अभ्यास यात कायम समन्वय ठेवला. म्हणुन आज अनेक गोष्टींमध्ये, अनेक स्तरावर, समन्वय ठेऊ शकते. यानंतर अध्यक्षीय समारोपात डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे ” प्रेरणादायी करीयर ऐकणे फार महत्त्वाचे असते. करीयरला दिशा देणारा असा कार्यक्रम तुम्ही ग्रहण केला पाहिजे. चौफेर ज्ञान मिळवा. आवांतर वाचन ठेवा. त्याशिवाय पर्याय नाही. तुम्हीच तुम्हाला घडवणार आहे. तुमची आंतरीक इच्छा शक्ती तुम्हाला उंचावर घेऊन जाते.

डोळ्यासमोर आयडाॅल ठेवा. चांगल्या व्यक्तीला आयडाॅल म्हणुन घ्या. आज तुमच्या बरोबर काळ आहे.. तो गेला की परत येत नाही.” या संपूर्ण कारेक्रमाचे सुत्रसंचलन प्रा जयश्री चौधरी यांनी केले, तर आभार सी ए डॉ श्वेता चोरडिया यांनी मानले. या कारेक्रमासाठी डॉ अनुपमा चौधरी, श्वेता फेगडे,दिपाली पाटिल, धनश्री चौधरी, प्रियांका खरारे, कविता पवार ,नेहा ललवाणी, यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.