खाद्यसंस्कृती: इटालियन गार्लिक सूप विथ क्रूटॉन्स

0

खाद्यसंस्कृती विशेष लेख

 

पावसाच्या सरी कोसळू लागल्या, वातावरण एकदम मस्त आणि गारवा दाटलेला. आणि मग गरमागरम वाफाळलेल्या चहा किंवा कॉफीचा दरवळणारा वास, आणि आपण खिडकी जवळ बसून त्याचा आनंद घेताना… किती मस्त वाटत ना… पण आज आपण गरमागरम वाफाळलेला चहा किंवा कॉफी नाही तर गरमागरम सूप बनवणार आहोत.

साहित्य:

१ कांदा, ४/५ कांद्याची पात, १ बटाटा, १०/१२ लसूण पाकळ्या, थाईम हर्ब्स (नसल्यास ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब्स वापरु शकता), १ वाटी क्रिम, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, फ्रेश पार्स्ले (फ्रेश पार्स्ले नसल्यास कोथिंबीर वापरू शकता.) चवीनुसार मीठ, २ चमचे तेल

क्रूटॉन्ससाठी:
४ स्लाईस ब्रेड, २/३ चमचे तेल

कृती :
१) प्रथम एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतवून घ्या.
२) नंतर कांदा पात घालून परतवून घ्यावे. लसूण पाकळ्या बारीक चिरून त्यामध्ये परतून घ्यावे.
३) बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यात परतवून घ्यावे.
४) थाईम हर्ब्स घालून मिश्रण परतवून त्यामध्ये २ ग्लास पाणी घालून १०/१५ मिनिटे चांगले शिजवून घ्यावे.
५) चवीनुसार मीठ व ब्लॅक पेपर घालावे.
६) आता क्रिम घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे व थंड करण्यासाठी ठेवून ध्यावे.
७) थंड झालेले मिश्रण मिक्सर मधून एकदम क्रिमसारखे स्मूद करुन घ्यावे.
८) तयार सूप एका कढईमध्ये काढून मंद गॅसवर गरम करावे. फ्रेश पार्स्ले बारीक चिरून त्यामध्ये घालून चांगले गरम करावे. (फ्रेश पार्स्ले नसल्यास कोथिंबीर वापरू शकता.)
९) गरम सूप मध्ये वरतून क्रूटॉन्स आणि पार्स्ले घालून सर्व्ह करावे.

क्रूटॉन्स :
ब्रेडचे तुकडे करून ते एका पॅनमध्ये तेल घालून मंद गॅसवर ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यावे.

जोरदार पावसाच्या सरींचा आवाज, भिरभिरणारा थंड वारा आणि गरमागरम सूप असा आनंद अनुभवयाला मी पावसाची आतुरतेने वाट पाहत असते….
आता तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात क्रिमी गार्लिक सूपचा आनंद नक्कीच घ्या.

 

– अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे.
पत्रकार/फुड ब्लॉगर
९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.