इकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये पदवी समारंभ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

इकरा युनानी मेडिकल कॉलेज मधील 2018 बॅच चे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र अरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे BUMS पदवी अभ्यासक्रम पुर्ण केले त्यांची पदवी वितरण समारंभ दिनांक 17/02/2024 रोजी महाविद्यालयात कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. त्या मध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार व संस्थेचे एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अब्दुल अजीज सालार, अमीनुद्दिन बादलीवाला, नबीदादा बागवान, तारीक अन्वर, रमीज बाद्लीवाला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवराचे प्राचार्य, उप-प्राचार्य व शिक्षक यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मुफ़्ती इमरान यांनी कुरान पठन करुन केली. तसेच विद्यार्थ्यांनी हम्द व नात-ए-पाक म्हटले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते. त्या नंतर विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनी महाविद्याल्यात होणा-या अभ्यासक्रमाचे वर्षभर होणा-या विविध कार्यक्रमाचे, शिक्षकांचे तसेच त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष यांचे परिश्रमाचे कौतुक केले व आपण विद्यार्थ्यांना शिस्त बद्ध त्यांच्या जिवनात घड्वित आहात त्याचे मनापासुन आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्या हस्ते 49  विद्यार्थ्याना BUMS पदवी वितरण करण्यात आले. संस्थेचे सचिव एजाज मलिक यांनी सांगितले कि आज आमच्या महाविद्यालयातील हजार विद्यार्थी विद्यार्थींनी डॉक्टर बनलेले आहे. हे आमच्या साठी गर्वाची गोष्ट आहे तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सुभेच्छा दिले.

महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या वेळेस प्रवेशासाठी आले त्या वेळी काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती ते मधुनच अभ्यासक्रम सोडत होते त्यांना धिर देऊन पदवी पुर्ण करण्यासाठी प्रावृत्त केले त्यांना संभाळून घेतले. आज ते विद्यार्थी डॉकटर होऊन आपली पदवी घेत आहे. संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार यांनी अध्यक्षीय भाषण करतांना डॉक्टरांना भावी  आयुष्याच्या सुभेच्छा दिले. आपण आता पर्यंत करत असलेल्या महेनतीचे फळ आहे आज तुम्ही समाजात डॉक्टर म्हणुन ओळखले जाणार आपण त्या प्रमाणे समाजात आपले स्थान निर्माण करावे कोणत्याही प्रलोबनाला बळी पडुन नये. डॉक्टर पेशा हे फक्त पैशे कमवणेसाठी नाही.

आमच्या महाविद्यालयातील सैकडो विद्यार्थ्यांनी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सुरु केले आहे. सदर बॅच हे 2018 मध्ये प्रवेशित असुन कोविड 19 चा सामुरे गेलेले आहे. कोविड 19 मध्ये बियुएमएस डॉक्टरांनी खुब मोठे कार्य केले आहे. कोविड सेंटर मध्ये काम करत होते. आपण समाजात चांगले काम करावे हि शुभेच्छा. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अयाज मोहसीन यांनी केले व या कर्यक्रमाचे यशस्वी साठी विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.