“बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता”

0

लोकशाही विशेष लेख

बुद्धिमत्ता (Intelligence) हा सर्व पालकांच्या व्यक्तींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच ठिकाणी पालक हे आपल्या मुला मुलींना कारण नसताना याला तर बुद्धीच नाही, याच तर डोकच चालत नाही, याचा तर बुद्धिगुणांकच कमी आहे, याला तर जनरल नॉलेज नाही, अशी एक ना अनेक प्रकारे नाहक टोमणे मारत त्यांच्या लेकरांचा त्यांच्या नाकर्तेपणातून मोठ्या प्रमाणात छळ करताना दिसतात. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे बुद्धिगुणांक हा घटक देखील अनुवंशिकतेचा (Heredity) ठेवा आहे. बुद्धी हा शब्द बोधात्मक स्वरूपाचा दिसून येतो. बोधात्मक क्रियांची क्षमता मानवात जन्मजात असते. म्हणूनच बुद्धिगुणांकाचे सूत्र हे बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागीला शारीरिक वय गुणिला शंभर असे आहे.

बुद्धिमत्ता म्हणजे सारासार विचार करून अचूक निर्णय घेण्याची क्षमता. टरमन (Terman) या मानसशास्त्रज्ञाने “बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता” असे सांगितले आहे. बुद्धिमत्ता ही व्यक्तींप्रमाणेच प्राण्यांमध्ये देखील असल्याचे चांगल्या पद्धतीने दिसून येते. मूळ मानवाची उत्पत्तीच ही माकड या प्राण्यापासून झालेली आहे. आजच्या आधुनिक युगात तर यंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर यंत्राच्या साह्याने मानव कुठल्याही प्रकारचे कार्य करून घेण्यात यशस्वी झालेला आहे. यंत्रमानवांचा तो सर्व सुखासाठी यशस्वीपणे वापर करण्याचा पूर्ण प्रयत्ननात आहे.

सर्वसाधारणपणे मानसशास्त्रामध्ये बुद्धिमत्ता तपासणी करण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्या या शाब्दिक आणि अशाब्दिक अशा प्रकारच्या वैध आणि विश्वसनीय आहे. या चाचण्यांच्या साह्याने आपल्याला व्यक्तीच्या बुद्धिगुणांकाची पातळी अचूकपणे सांगता येते. सर्वसाधारण त्यानुसार ७० पेक्षा कमी बुद्धिगुणांक असणारी व्यक्ती ही मतिमंद आहे. ७० ते ९० बुद्धिगुणांक असणारी व्यक्ती ही सीमावर्त बुद्धीची असते. ९० ते ११० बुद्धिगुणांक असणाऱ्या व्यक्ती या सर्वसामान्य बुद्धिगुणांकाच्या असतात. लोकसंख्येमध्ये सर्व सामान्य बुद्धिगुणांक असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण हे जवळ जवळ ७० ते ७५ टक्के इतके आहे. ११० ते १४० बुद्धी गुणांक असणाऱ्या व्यक्ती या कुशाग्र अतिकुशाग्र बुद्धिमत्तेच्या असतात. १४० च्या पुढे बुद्धिगुणांक असणाऱ्या व्यक्ती प्रतिभावान बुद्धीच्या असतात. त्यात अल्बर्ट आईन्स्टाईन, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड, जागतिक कीर्तीचे नेते, कला कौशल्य निपुण सर्वश्रेष्ठ व्यक्तींचा देखील या प्रतिभावान संपन्न व्यक्तींमध्ये समावेश होतो. एक गोष्ट या ठिकाणी लेखकाने संशोधित केली आहे.

ती म्हणजे यासारख्या व्यक्तींचा रक्तगट देखील अपवादात्मक स्वरूपाचा म्हणजेच निगेटिव्ह टाईप असणारा होता. त्यात मग अब्दुल एपीजे कलाम, महात्मा गांधी, कॉफी अन्न, मदर तेरेसा, लेडी डायना हेडन, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, मीनाताई बाळासाहेब ठाकरे, रतनलाल सी बाफना यांच्या सारख्या कितीतरी महात्म्यांची नावे सांगता येतील.


प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव/बडगुजर
हॅपी मिरर रिसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशन, जळगाव
९३७३६८१३७६

Leave A Reply

Your email address will not be published.