इंडिगोचे विमान उडवून देण्याची धमकी

0

मुंबई ;- चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-5188 ला हवेत बॉम्बच्या धमकीचं पत्र मिळाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विमानात काहीही संशयास्पद आढळलं नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. इंडिगोचे विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंडिगो एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, चेन्नईहून मुंबईला येणारे इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E5188 मंगळवारी मुंबईत उतरणार होते. तेव्हा पार्किंग परिसरात बॉम्बची धमकी मिळाली.

इंडिगो कंपनीचं 6E-5188 विमान मंगळवारी सकाळी चेन्नईहून मुंबईसाठी उड्डाण केलं होतं. विमान मुंबईपासून 40 किमी अंतरावर असताना कर्मचाऱ्याला विमानाच्या शौचालयात एक चिठ्ठी सापडली. ‘तुम्ही मुंबईत आलात तर सगळे मरतील’, असं या चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यामुळं प्रवाशांमध्ये एकच धांदल उडली. या धमकीची बाब केबिनक्रूच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं पायलटला याची माहिती दिली. तसंच विमानाच्या कॅप्टननं तातडीनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली.

इंडिगो विमान मुंबईत उतरताच संपूर्ण विमान तसंच प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विमानात काहीही संशयास्पद आढळलं नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.