ब्रेकिंग ! इम्रान खान यांना १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच पीटीआय पक्षाचे संस्थापक इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना मंगळवारी सायफर प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

सायफर प्रकरण

पाकिस्तानच्या एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, सत्तेत असताना राजकीय हेतूने गोपनीय डिप्लोमॅटिक केबलचा (सायफर) गैरवापर केल्याचा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला होता. यानुसार ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला गुरुवारी मतदान होत आहे, यापूर्वी इम्रान खान यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गुप्त डिप्लोमॅटिक.. 

इम्रान खान (वय ७१) आणि कुरेशी (वय ६७) यांना रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये वॉशिंग्टनमधील पाकिस्तानच्या दूतावासाने पाठवलेल्या गुप्त डिप्लोमॅटिक केबलची सामग्री उघड करून अधिकृत गुप्त कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. खान यांच्या ताब्यातून सायफर गायब झाल्याची माहिती आहे. या केबलमध्ये अमेरिकेकडून पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ सरकार पाडण्याचा धोका असल्याचा दावा या दोघांनी केला होता.

पदावरून हकालपट्टी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची एप्रिल 2022 मध्ये अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. सत्तेतून हकालपट्टी झाल्यापासून त्यांच्यावर 150 हून अधिक गुन्हे दाखल आहेत, असेही माध्यमांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.