अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॉला पकडला !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर महसूल विभागाच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार यांनी रावेर शहरातून मध्यरात्री ट्रालाच्या माध्यमातून वाळूची वाहतूक होत असल्याने कारवाई केली. यात ट्राला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूकादारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रावेर शहरातून मध्यरात्री दिडच्या सुमारास (एमएच २० ईजी ६१९७) १४ चाकी ट्रालाच्या माध्यमातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार प्रशिक्षणार्थी तहसीलदार डॉ मयूर कळसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने रात्री कारवाई करत ट्राला जप्त केला आहे. कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाल (ता रावेर) येथून सुकी नदी पात्रातुन दरोरोज शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. ट्रकाद्वारे ही वाळू रात्री दोन ते तीनच्या सुमारास रावेर रसलपुर कुसुंबा सावदा भागात पोहचवली जाते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.