ICSE Board: दहावी, बारावीच्या पहिल्या सेमिस्टरचे निकाल जाहीर; असा पाहा रिझल्ट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ISC आणि ICSE परिक्षेच्या पहिल्या सेमिसटरच्या निकालाची वाट अनेक जण पाहात असतील. ‘काउंन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’ (CISCE)ने 10वी (ICSE) आणि 12वी (ISC) च्या पहिल्या सेमिस्टर परिक्षेचे निकाल जाहीर केला आहे.

http://cisce.org, results.cisce.org या वेबसाइट्स तुम्ही हा निकाल पाहू शकता. ICSE आणि ISC वर्ष 2021-22 च्या पहिल्या सेमिस्टर परिक्षेचा निकाल काउंन्सिलच्या करिअर पोर्टलवर, वेबसाइटवर किंवा एसएमएसद्वारे तुम्ही पाहू शकता. एसएमएसद्वारे निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सात अंकी युनिक आयडी क्रमांक टाईप करून 09248082883 या नंबरवर पाठवू शकता. त्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या नंबरवर तुम्हाला एसएमएस येईल.

असा पाहा रिझल्ट
– तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर http://cisce.org, results.cisce.org यापैकी कोणतीही एक वेबसाइट ऑपन करा.
– Results 2021 वर क्लिक करा.
-कोर्स कोड (ICSE/ISC), कँडिडेट UID, इंडेक्स नंबर आणि CAPTCHA टाका.
– ही माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
– निकाल पाहिल्यानंतर तो तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता.

ICSE ची परिक्षा गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2021 दरम्यान झाली होती. तर ISC ची परिक्षा 22 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. CISCE च्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही डिटेल्स मार्क चेक करू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.