पारोळ्यात घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा येथे  मोरफळ गल्लीतील मनोज जगदाळे यांच्या  घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत  लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मनोज जगदाळे यांचे पारोळा येथे फर्निचर व इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. या घराच्या खालच्या बाजूला दुकानांचे गोडाऊन असुन यात दुकानात विक्रीसाठी असलेल्या फ्रिज, ए सी, कुलर, टि व्ही, फर्निचर यासह अनेक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या या सर्व वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

दरम्यान  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पारोळा, अमळनेर, धरणगाव येथील नगरपालिकेच्या अग्नी बंबासह इतर ठिकाणच्या बंबानाही पाचारण करण्यात आले.  आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न केले.  तसेच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीचे गांभीर्य लक्षात घेता अमळनेर येथील डिवायएसपी नांदवळकर, पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक राजु यादव, पोलीस कर्मचारी यांच्यासह शहरातील अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहणी केली.  आगीवर रात्री उशिरा नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.