रेल्वे रुळावर आढळला महिलेचा मृतदेह

0

 

जळगाव : जळगाव ते शिरसोली रेल्वेलाईनच्या वाघनगरजवळील डाऊन रेल्वेरूळावर एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला. ही घटना रविवारी (दि. १) सकाळी साडेनऊ 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात ड आली आहे.

न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न जळगाव ते शिरसोली दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास डाऊन रेल्वेलाईनवरील रेल्वे खांब क्रमांक ४१५ च्या ७ ते ९ वाजेच्या जवळ एका ३५ ते ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती लोको पायलट शिवनाथ जागीर यांनी जळगाव रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक एस. बी. सनस यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी जळगाव तालुका पोलिसांना घटनेविषयी माहित

दिली. काही वेळातच पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल मोरे, अनिल फेगडे, भूषण सपकाळे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शासकीय जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.