महाराष्ट्रात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस

जुलै मध्ये पाऊस पुन्हा सक्रीय

0

 

पुणे 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता जुलै महिन्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. राज्यभरात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बसरणार, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

 

महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड मध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. लोणावळ्यात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर बंधारे वाहू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना जवळपास असलेलं कुंडमळा येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागलेत.

 

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे. घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि दाट धुके यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झाला आहे. यामुळे स्वर्ग धर्तीवर अवतरलाच्या चं चित्र पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे, निसर्गाची ही किमया लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर पर्यटक घेत आहेत. तर दुसरीकडे वाहनचालकाना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.