धक्कादायक ! ५ वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू

0

उत्तरप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आजकाल बदलती जैवनशैलीमुळे अनेक गंभीर आजार बळावत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना यूपीच्या अमरोहामधून समोर आलीय. ५ वर्षांची मुलगी  आईसोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि जमिनीवर पडला. आईनं मुलीला पाहिले तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान घाबरलेल्या कुटुंबाने मुलीला गावातील डॉक्टरांकडे नेले, तेथे मुलीला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावामध्ये राहणाऱ्या महेश खरगवंशी यांची ५ वर्षांची मुलगी कामिनी शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अंथरुणात बसली होती. ती आई सोनियासोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती खाली पडली. आधी आईला वाटलं ती मुद्दामाहून असं करत असेल. पण जेव्हा तिला हलवलं तेव्हा तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आई घाबरली. ती जोरजोरात ओरडू लागली तेव्हा कुटुंबीय आणि आसपासचे लोक तिथे जमले. त्यांनी तातडीने मुलीला गावातील डॉक्टरांना दाखवण्यास नेले. तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत खेळल्यानंतर तिने जेवण केले असं आईनं म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.