दगडी शिवारात सापडलेले हरीणचे पिल्लू वनविभागाच्या ताब्यात

0

मनवेल ता.यावल ; लोकशाही न्युज नेटवर्क

येथून जवळच असलेल्या दगडी येथे शेत शिवारात हरीण चे पिल्लू एका कुटुंबाला मिळून आले होते. त्यांनी ते पिल्लू त्यांनी आपल्या घरी ठेवले होते दरम्यान या संदर्भातील वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने संबंधित कुटुंबाकडून हरिण हस्तगत केले आहे. या हरिणच्या पिल्लुची वैद्यकीय तपासणी करून त्यास जंगलात सोडले जाणार आहे.

दगडी येथील हिरामण मोरे हे शेत शिवारात असतांना त्यांना हरीण चे पिल्लू मिळून आले होते. व ते हरिणचे पिल्लु मोरे यांनी आपल्या घरी आणले होते. तर या संदर्भातील माहिती वन विभागाला मिळाली व पश्चिम प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक यात वाघझिरा वनपाल विपुल पाटील, वनरक्षक अशरफ तडवी, रविकांत नगराळे, अक्षय रोकडे, समाधान पाटील, आर. बी. पाटील या पथकाने दगडी मनवेल या गावात जाऊन सदर हरिणचे पिल्लू ताब्यात घेतले व संबंधितांना समज देऊन हे पिल्लू वनविभागाच्या पथकाने यावल आणले आहे. आता या हरिणच्या पिल्लू ची वैद्यकीय तपासणी केल्या गेल्यानंतर त्याला सातपुड्याच्या जंगलात सोडले जाणार आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.