ज्येष्ठ विचारवंत हरी नरकेंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ लेखक, विचारवंत, मराठी ब्लॉगर आणि संत परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६० वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीत येत असतांना त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांनतर त्यांना वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. हरी नरके यांनी ५६ पुस्तकांचं लेखन आणि संपादन केले आहे. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र त्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.