गोंडावाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या १ ऑक्टोबर पर्यंत रद्द

0

भुसावळ:- मध्य रेल्वेच्या झांसी जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्र. ४ च्या दुरुस्तीच्या कामासाठी पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने उत्तर भारतात जाणाऱ्या सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये भुसावळ स्थानकावरून जाणाऱ्या गोंडावाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधित धावणार नसल्याने भुसावळ वरून जाणाऱ्या अनेक रेल्वे स्थानक मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या भूसावळ दिलेल्या माहितीनूसार, दर शुक्रवार आणि रविवारी प्रवास सुरु होणारी १२४०६ हजरत निजामुद्दीन – भुसावळ जंक्शन गोंडवाना एक्सप्रेस १५, १७, २२, २४ व २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच दर मंगळवार व रविवार प्रवास सुरु होणारी १२४०५ भुसावळ जं.-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस १७, १९, २४, २६ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. पायाभूत सुविधेच्या कामासाठी गोंडवाना एक्स्प्रेसच्या अप व डाऊन अशा दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दिल्लीला जाण्याचे नियोजन करून ठेवलेल्या राज्यातील भुसावळ पासून जाणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचे यामुळे गैरसोय होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.