धरणगाव पोलिसांची कारवाई ; आरोपींकडून दरोड्याचे साहित्य जप्त
धरणगाव ;- दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ५ दरोडेखोरांना धरणगाव पोलिसांनी पाळधी ते सावदा प्रचा शिवारात ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिताफीने अटककेली असून त्यांच्याकडून बोलेरोवाहन , कुऱ्हाड, लोखंडी सळई, मिरची,सूर,असे साहित्य आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या धरणगाव पोलिसांच्या पाळधी ते सावदा प्रचा शिवारात गावाचे अलीकडे संप्तशिंगी मातेच्या मंदीराजवळ महेंद्र बुलेरो गाडी क्र. (MP- ४६-G-११४७) हिच्यात दरोडा घालण्याचा साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.
गाडीमध्ये एक लोखंडी कु-हाड लोखंडी सळई सुताचा दोर असे साहित्य मिळून आले. त्यानंतर पाच जणांची अंगझडती घेतली असता एकाच्या कमरेला एक धारदार पाते असलेला चाकू तर दुसऱ्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टीक पिशवीत लाल मिरचीची पावडर व कमरेला पेन्चीस मिळून आली.
अनिल लासग भिल (वय २१ वर्ष रा. मोहाला पोस्ट- चापोरा ता. सेंधवा जि. बडवाणी),नानुसिंग रूपसिंग बारेला (वय २५ वर्ष रा. रजानेमल ता. सेंधवा जि.बडवाणी चापोरा ता. सेंधवा, जानमन रुमालसिंग बारेला (वय-२२ वर्ष रा. मोहाला पोस्ट-जि. बडवाणी), भाईदास पातलिया भिलाला (वय- २९ वर्ष रा. दिली ता. संधवा जि. बडवाणी, हत्तर गनदा चव्हाण (भिलाला) वय-२२ वर्ष, रा. हिंदली ता. सेंधवा जि. बडवाणी, अशी आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ हे करीत आहेत.