सातवीच्या विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात ८ विद्यार्थी ठार

0

 

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

युरोपातील एका शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्याने बेधुंद गोळीबार केल्याने यात ९ जण ठार झाल्याची घटना सर्बिया देशात घडली आहे. या घटनेमुळे जगात बालगुन्हेगारी वाढली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मृतांमध्ये ८ विद्यार्थी आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. शिवाय अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सर्बियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेबाबतची माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनामध्ये सांगितले आहे की, ‘गोळीबार झाल्याचे माहिती होताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली आहे’.

दरम्यान, याप्रकरणी एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितावर त्याच्या वडिलांची बंदूक वापरल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.