आजही सोने- चांदीला झळाळी ! जाणून घ्या आजचे नवे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढतच आहे. आज 16 एप्रिल 2022 रोजी 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांची वाढ झाली आहे.

त्यानंतर सोन्याची किंमत 49,550 रुपयांवर गेली आहे. त्याचवेळी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ दिसून आली आहे. त्याची नवीन किंमत 54,060 रुपये आहे. तर, चांदीच्या दरात 1 किलोमागे 700 रुपयांनी वाढ होऊन त्याची किंमत 70,000 रुपयांवर पोहोचली आहे.

जळगावमध्ये आजचा सोन्याचा भाव 54,600 आणि चांदीचे भाव 72,200 आहे. नाशिकमध्ये सोन्याचा भाव 54,630 आणि चांदीचे भाव 72,100 आहे. औरंगाबादमध्ये सोन्याचा भाव 54,720 आणि चांदीचे भाव 72,400 आहे.

चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांत एक किलो चांदीची किंमत 74 हजार 400 रुपये आहे. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, केरळ आणि पुणे येथे एक किलो चांदीची किंमत 70 हजार रुपये आहे. देशातील प्रत्येक राज्यात सोन्या-चांदीची किंमत वेगवेगळी असते. शुल्क, उत्पादन शुल्क आणि राज्य कर यामुळे सोने आणि चांदीचे भाव बदलत असतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.