दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर सोने-चांदी झाले स्वस्त

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट प्रतिग्रॅम सोन्याचे दर 300 रूपयांनी घसरले आहेत. आता 10 ग्रॅम सोन्यासाठी 61,450 रूपये मोजावे लागतील. तर 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 56,350 आहेत.

रविवारी हाच दर 56,600 रूपये इतका होता. तर एक किलो चांदीचे दर 200 रूपयांनी घसरले असून ते 75,100 रूपयांवर पोहचले आहेत. दसऱ्यामुळे सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये लोकांची गर्दी होत आहे.

 

अपडेट लवकरच.. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.