सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या नवे दर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोन्याच्या दरात चढ उत्तर सुरूच आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या दर वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारतही सोने तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे.

यामुळे देशांतर्गत बाजारात शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,८७७ रुपयांवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी (दि.१५) सुरुवातीच्या व्यवहारात शुद्ध सोन्याच्या दरात ४७७ रुपयांची तेजी दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,८७७ रुपयांवर खुला झाला आहे. तर २३ कॅरेट ५२,६६५ रुपये, २२ कॅरेट ४८,४३५ रुपये, १८ कॅरेट ३९,६५८ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,९३३ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीचा प्रति किलो दर ६२,४६७ रुपयांवर गेला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,७४३ रुपयांवर खुला झाला. याआधीच्या सत्रात हा दर ५२,७१८ रुपयांवर बंद झाला होता. ५२,९२९ आणि ५२,७०३ रुपयांदरम्यान व्यवहार केल्यानंतर सोन्याच्या दरात १९८ रुपयांची तेजी आली. यामु‍ळे सोने ५२,९१६ रुपयांवर व्यवहार करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.