सुवर्णनगरीत सोन्याची झळाळी ; दर ६५ हजार ८०० वर पोहचले

0

जळगावः – देशभरात सोने चांदीच्या दागिण्यांसाठी प्रसिध्द असलेल्या सुवर्णनगरी अर्थात जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने झळाळी घेतली असून तोळ्याला ६५ हजार ८०० दर पोहचल्याने नवा उंच्चाक गाठला आहे. २४ कॅरेट सोने प्रतीतोळे ६५८०० तर २२ कॅरेटचे सोने ६० हजार २७० रूपये प्रतितोळा दराची काल नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसापुर्वीच सोन्याच्या दराने ६५ हजाराचा टप्पा पार केला होता. तर गेल्या ११ महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल ५ हजाराने वधारला आहे .

मार्च महिन्याच्या सुरूवाती पासूनच सोन्याच्या दरात मोठी वाढ होतांना दिसुन येत आहे. दि.५ मार्च रोजी दरतोड्या मागे ८५० रूपये दर वाढ होवून ६४ हजार ६५० रूपये दर झाला होता. तर दुसऱ्याच दिवशी दरात २५० रूपयांनी वाढ होत सोने ६५ ११ महिन्यात ५ हजाराने वधारले सोने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सोने प्रतितोळा आता ६० हजार १५० रूपये होते. मे महिन्यात हा दर ६२ हजार १०० वर गेला होता. नोव्हेंबर महिन्यात यात पुन्हा वाढ झाली आणि दर ६३ हजार पार गेले. डिसेंबर ते फेब्रुवारी अखेर हे दर ६४१०० पर्यंत राहीले. आता मार्चच्या सुरूवातीलाच सोने ६५ हजार पार जावून दुसऱ्या आठवड्यात ६५ हजार ८०० वर पोहचले आहे.

दि.७ रोजी सकाळी सोन्याच्या दराने नवा उंचाक गाठत तब्बल ६५८०० चा दर गाठला आहे. रात्री उशिरा क्लोजींग वेळी हा दर ६५५०० प्रति तोळा झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.