सोने चांदीच्या दरात उसळी ; दरात झाली मोठी वाढ …

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत असून आज सोन्याच्या भावात वाढ होऊन चांदी प्रतिकिलो साडे ७६ हजारांवर जाऊन पोहचल्याचे चित्र आज जळगावच्या सुवर्णबाजारात पाहायला मिळाले.

चांदीच्या भावाने तर गेल्या अडीच वर्षांपूर्वीचा भावाचा उचांक मोडला आहे. आज सकाळपासूनच जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या दराने चांगलीच उसळी घेतली .

सोने प्रति १० ग्राम ला आज ६० हजार ९२० रुपये भाव दुपारी अडीच वाजेपर्यंत नोंदविला गेला. तर चांदीची प्रतिकिलो कालच्या तुलनेत ४५० रुपयांनी वधारले असून आज चांदी प्रतिकिलो ७६ हजार ५१० रुपये इतकी जाऊन पोहचली . सोने चांदीमध्ये गुंतवणूक पाहता यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.