गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना टिप्स

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात अविनाश भास्कर चाटे, अविनाश साखरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत त्यांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर आणि नेतृत्व प्रशिक्षक म्हणून त्यांचे ७०० हून अधिक सार्वजनिक भाषण कार्यक्रम झालेले आहे.

प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक दिपक झांबरे, विद्युत अभियांत्रिकीचे प्रमुख प्रा.तुषार कोळी, विद्यूुत अभियांत्रिकी व यंत्र तंत्रनिकेतन विभागाचे प्रमुख प्रा.कैलास माखिजा, गोदावरी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.चेतन विसपुते, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर विजयकुमार वानखेडे यांच्यासह प्राध्यापक वृंद शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

कार्यक्रमात अविनाश चाटे व अविनाश साखरे यांनी ध्येय, टार्गेट्स, गोल्स या संदर्भात मार्गदर्शन केले. या सर्व गोष्टींची माहिती देताना या सर्व बाबी त्यांनी उदाहरणासहित विद्यार्थ्यांना पटवून दिल्या. त्याचप्रमाणे त्यांनी काही प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ध्येय त्यांनी कशा प्रकारे तयार करावीत व ध्येय गाठण्यासाठी कशा प्रकारच्या कृतीचा अवलंब करावा या गोष्टी सांगितल्या. मन हा केंद्रबिंदू असून मनावर ताबा कसा मिळवायचा व आत्मकेंद्री असण्याचे फायदे सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या संपूर्ण सेशनमध्ये विद्यार्थ्यांशी सहजगत्या संवाद साधून त्यांना बोलते केले. यश मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मार्गांचा अवलंब करावा यावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यांचे संपूर्ण सेशन प्रेरणादायी होते. या मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला व नवीन काहीतरी शिकण्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वेणू फिरके यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.