सुप्रसिध्द “पूर्णब्रह्मा”च्या जयंती कठाळे उलगडणार यशोगाथा

0

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क

“जागतिक महिला दिन’ अंतर्गत सुरु असलेल्या जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील महिला सन्मान सप्ताहात आज ता. ११ शनिवार रोजी अस्सल मराठमोळ्या चवीच्या खाद्यपदार्थांसाठी भारतासह, अगदी सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या ‘हॉटेल पूर्णब्रह्म’च्या महिला उद्योजिका जयंती कठाळे यांच्या कार्यप्रवासाचा आढावा त्याच्याच विशेष मार्गदर्शनाने आयोजिले आहे. हा कार्यक्रम जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या सभागृहात सकाळी ठीक १० वाजता होणार असून यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यासहित जळगाव शहराच्या महापौर जयश्री पाटील, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व सॉफ्ट स्कील ट्रेनर तसेच प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या राजकुमार यांची उपस्थिती असणार आहे. तसेच यावेळी आयोजकांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श उद्योजिका सन्मानाचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते होणार असून विविध क्षेत्रातील उद्योजिकाना यावेळी विशेष पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या अनुषंगाने या कार्यक्रमाला शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.