२२ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील वडगाव येथे २२ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनी उर्फ सविता किरण राठोड (वय २२, रा. वडगाव नालबंदी ता. भडगाव जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सोनी राठोड ही आपल्या कुटुंबियांसह राहते. सोनी राठोड हिने ५ एप्रिल रोजी घरी कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी समोर आली आहे. सदर प्रकार सायंकाळी तिचे कुटुंबिय घरी आल्यावर लक्षात आला.

दरम्यान शेजारील लोकांच्या मदतीने तिला भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले, यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. सोनी राठोड हिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीय. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.