पिंप्राळा परिसरात घरफोडी ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;-बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातून ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना शहरातील पिंप्राळा भागातील समर्थ नगरात बुधवारी दि. २९ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संगीता काशिनाथ कोळंबे (वय ४३, रा. समर्थ नगर पिंप्राळा, जळगाव) या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दि. २५ एप्रिल रोजी त्या घर बंद करून नातेवाईकाकडे गेलेल्या होत्या. तेव्हापासून त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी दि. २९ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली. त्यानंतर महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.