जळगावात घरफोडी ; ५० हजारांचा ऐवज लंपास

0

जळगाव ;- शहरातील भिकमचंद जैन नगर परिसरात असलेल्या वाघुळदे नगरात अज्ञात चोरटयांनी घराचा काडी कोयंडा तोडून रोकड आणि चांदीच्या वस्तू चोरून नेल्याचा प्रकार २६ ते २७ जानेवारी दरम्यान घडला असून चोरटयांनी ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, कैलास गजानन कवडीवाले वय ६२ हे व्यावसायिक असून त्यांच्या वाघुळदे नगरातील बंद घरातून अज्ञात चोरटयांनी १४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरटयांनी २६ ते २७ जानेवारी दरम्यान चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किशोर निकुंभ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.