गाझातील रुग्णालयात भीषण स्फोट, ५०० जणांचा मृत्यू

0

तेल अविव :-  इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आता चिघळले असून त्याने भीषण रूप धारण केले आहे. या युद्धात आजवर तब्बल 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे,

 

अशातच आज पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला की इस्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला असून यात ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. .

 

या दरम्यान, गाझातील अल-अहली या सिटी रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झालाय, हमास संघटित आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. एपी या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.हमासने युद्ध पुकारल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. तसंच, इस्रायलने तेथील मानवतावादी सुविधाही खंडित केल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत. अनेक रुग्णालयातील इंधन साठाही संपत आल्याने रुग्णांचा जीवही धोक्यात आला आहे.

 

दरम्यान, गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतांचा खच पडला असून इमारतीच्या खिडक्या-दारेही तुटली आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. तर, त्यांच्या मृतदेहांशेजारी ब्लँकेट, शाळेच्या बॅगा आणि इतरस्त्र वस्तू पडल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.