मोठी बातमी :ड्रग्स तस्कर ललित पाटील याला तामिळनाडू येथून केली अटक

0

मुंबई ;_ पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडू येथून  ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा आरोपी २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. पण अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूील चेन्नई येथून ललित पाटील याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा आरोपी २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.