गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

0

नवी दिल्ली, लोकशाही

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जगभरात गॅसची टंचाई निर्माण होणार आहे, त्याचे परिणाम भारतालाही भोगावे लागणार असून गॅसची किंमती दुप्पट होणार आहेत. त्यात सीएनची, पीएनजी आणि विजेच्या किंमतीही वाढणार आहे. तसेच सरकारच्या खतावरील अनुदानावरील बिलही वाढणार आहे.

जग भरातील कोरोनाची लाट ओसरत असतांना जागतिक अर्थव्यवस्था त्यातून सावरत आहे. असे असताना जगात उर्जेची मागणी वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी २०२१ मध्ये तशी उपाययोजना न केल्यामुळे त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे. एप्रिल महिन्यात सिलिंडरच्या किंमती वाढतील असा अंदाज व्यक्त होत आहे. देशात होणारा एलएनजी गॅस आधीच महागड्या किंमतीत विकत घेत आहे. भारताने मोठ्या काळासाठी करार केल्याने एलएनजीची किंमत कच्च्या तेलाशी संबंधित आहे. देशात स्पॉट मार्केटमधून गॅस घेण कमी केले आहे, या बाजारात गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत २.८ प्रति एमएमबीटीयू ने वाढून ६ ते ७ डॉलरने वाढण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार खोल समुद्रातून निघणार्‍या गॅसची किंमत ६.१३ डॉलरवरून १० डॉलर पर्यंत वाढणार आहे. कंपनी पुढील महिन्यात गॅसचा लिलाव करणार आहे. कंपनीने गॅसची किंमत फ़्लोर प्राईस आणि कच्च्या तेलाच्या किंमतीसोबत जोडले आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति एमएमबीटीयू १४ डॉलर इतकी आहे.

नैसर्गिक गॅसची किंमत देशात दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात ठरते. एप्रिल महिन्यातील गॅसची किंमत २०२१ च्या जानेवारी ते डिसेंबरमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय किंमतीवर असणार आहे. सीएनजीची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक डॉलरने वाढल्यास देशात गॅस साडेचार रुपयांनी वाढतो. म्हणजेच सीएनजीची किंमत १५ प्रति किलोने वाढण्याची शक्यता आहे अशी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.