महागाईचा भडका : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

एलपीजी गॅसच्या किमतीत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यात वाढ करण्यात आल्याने गृहिणींचे बजेट आता कोडलमडणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत 1102.50 रुपये झाली आहे.

याआधी मुंबईत LPG सिलिंडरची किंमत 1,052.50 रुपये प्रति युनिट होती. जुलै महिन्यानंतर पुन्हा एकदा सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

दिल्लीत आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 1103 प्रति सिलिंडर असणार आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे या वाढीमुळे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 2119.50 रुपयांच्या घरात असणार आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. तसेच स्थानिक करांमुळे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती एका राज्यानुसार बदलतात. इंधन विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात आणि त्यानुसार दर ढरविले जातात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.