सम्राट कॉलनी येथील तरुणच गळफास

0

जळगाव ;- शहरातील सम्राट कॉलनी येथील एका तरुणाने ५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी उघडकीस आला असून सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी,की सुनिल मधुकर चौधरी वय 35 रा. सम्राट कॉलनी जळगाव याने ५ रोजी राहत्या घरी गळफास घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल केले असता

C.M.O. डॉ. सचिन पाटील सिव्हील हॉस्पिटल यांनी त्याला तापासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोकों/ शांताराम पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.