वरणगाव : – तालुक्यातील मन्यारखेडा येथील समाधान पुंजु न्हावर्ड (वय ३३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. समाधान पुंजु न्हावडे राहणार मन्यारखेडा तालुका भुसावळ यांने त्याचे राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैदयकीय अधिकारी डॉ उगले यांनी मृत घोषीत केले.
विनोद तुकाराम घोडके वय ४२ धंदा खाजगी चालक राहणार साकरी यांचे खबरदारीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र जैन यांनी दाखल केले असून तपास पो हे कॉ मनोहर पाटील करीत आहे.