Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»नवरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लांबविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या
    गुन्हे वार्ता

    नवरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लांबविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 9, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अवघ्या तीन तासात पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल ; चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

    चाऴीसगाव;- शहरातील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी ७ रोजी श्रीमती सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचे लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी नवरीचे सोन्याचे दागीणे, रोख रुपये व ऍ़पल कंपनीचा आयफोन 13 हा मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये होता . मात्र हि पर्स
    एका भामट्या चोराने लांबविल्याचा प्रकार घडल्याने नावरीकडील मंडळी हवाल दिल झाले होते. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चाळीसगाव पोलिसांनी त्वरित चोरट्याचा शोध घेऊन त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

    सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशान्वये .अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे तसेच .सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि.योगेश माळी, पोना/दिपक पाटील, पोकॉ/नंदु महाजन, पोकॉ/अजय पाटील, पोहेकॉ/राहुल सोनवणे, पोकॉ/विनोद खैरनार, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकॉ/आशुतोष सोनवणे, पोहेकॉ/नितीन वाल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन फिर्यादी व साक्षीदार यांना सविस्तर विचारपुस करुन तसेच घटनास्थळी आलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी हॉटेलमधील व रोडवरील असलेल्या इतर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तसेच धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेल चालक यांना चोरी करणाऱ्या इसमाचे फुटेज दाखवुन व इतर तांत्रीक माहीतीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीला बायपास रोडवरील कोदगाव चौफुली जवळ मुद्देमालासह अटक केली.

    सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादी यांनी सांगीतलेली सविस्तर हकीकत व मिळालेल्या माहीतीवरुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बालवीर माखन सिसोदीया वय-19 वर्षे रा. गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड (मध्यप्रदेश) याचा चाळीसगाव शहर परिसरात शोध घेता तो मिळून आल्याने त्यास गुन्ह्यामध्ये ताब्यात घेवुन अटक कऱण्यात आलेली आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेल्या 6,85,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा पोलिसांनी खबर प्राप्त होताच 3 तासांपेक्षा कमी कालावधीत उघडकीस आणल्यामुळे पोलिसांचे कामाचे वधू व वराकडील नातेवाईकांनी कौतुक करून गौरवण्यात आले ..सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोना/3122 दिपक पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार असे करीत आहेत

     

     

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #chalisgaon #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif