शैलेश कुलकर्णी याने रांगोळीतून साकारली गजानन महाराजांची कलाकृती

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

आज श्री. संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन संपूर्ण देशासह महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने श्री. संत गजानन महाराज यांच्याविषयी ओढ निर्माण झालेला शहरातील कलावंत शैलेश कुलकर्णी याने पुनगाव रोडवरील श्री. संत गजानन महाराज मंदिरात सलग आठ तासांच्या मेहनतीने गजानन महाराज यांची हुबेहूब वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळीच्या माध्यमातून ८ बाय ४ आकाराची भव्य कलाकृती तयार केली आहे. शैलेश कुलकर्णी यांनी साकारलेल्या कलाकृतीचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.