छप्पर उडालेल्या बसचालकाचा अनोखा स्टंट, गडचिरोलीतील धक्कादायक प्रकार समोर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लालपरीची कशी दयनीय अवस्था आहे हे सर्वांनाच चांगल्या पद्धतीने माहित आहे. गडचिरोली (Gadchiroli) मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यात एसटी चालक वेगळाच स्टंट करत असल्याचे दिसून येत आहे. सांगली आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक व्हिडिओ संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. एसटीचे छत गळत असल्यामुळे एसटी चालकाने आपल्या एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने बसचे स्टेअरिंग पकडल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार पाहून प्रवाशांनी सरकारवर चौफेर टीका केली आहे.

छत्री हातात पकडून चालक बस चालवतोय
गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक हातात स्टेअरिंग आणि एका हातात वायपर फिरवत असेल बसचा व्हिडिओ राज्यात सगळीकडे पाहायला मिळाला होता. त्याच आगारचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पाऊस सुरु असतांना बसचे छत गळत असल्याने चक्क चालक बसमध्ये छत्री घेऊन बसला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नव्या व्हिडीओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असल्याचं दिसून आले. एकीकडे राजकीय मंडळी गडचिरोलीत विमानतळ उभारण्याच्या बाता करत असले, तरी गडचिरोलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात एसटीच्या आगारात बस गाड्यांची दयनीय अवस्था आहे. एसटी नेहमी वेगळे किंवा अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्याचा व्हिडीओ सुध्दा चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.