लोकशाही न्युज नेटवर्क
प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. चाहते सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
https://twitter.com/iamsunnydeol/status/1618490719710384129/photo/1
‘गदर 2’ स्वातंत्र्य दिनापूर्वी 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.सनी देओलने सोशल मीडियावर ‘गदर 2’चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे.पोस्टर शेअर करताना सनी देओलने लिहिले की, ‘हिंदुस्तान जिंदाबाद है… जिंदाबाद था… और जिंदाबाद रहेगा! या स्वातंत्र्यदिनी आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतरचा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. ‘गदर 2’ 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात. यासोबतच सनी देओलनेही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.