जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले २० पेटंट व २५ कॉपीराईट

जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या ओचीत्त्याने विद्यार्थी, प्राध्यापकांची कामगिरी ; विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जळगाव मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day) सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट (G. H. Raisoni Institute) ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात पेटंट व कॉपीराइट्स संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १५१ कॉपीराइट्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी दाखल केले. इस्टीट्युटच्या इंडस्ट्री प्रॅक्टीसेस, अॅकडमिक, शैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत यासह स्टुडंट्स प्रोजेक्टवरील पोस्टर, लॅब मॅन्युअल, कोर्स नोट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, मोनोग्राफ आदी बाबींवर हे कॉपीराइट दाखल करण्यात आले आहेत. यावेळी मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ‘मानवाद्वारे साकारण्यात येणारे कोणत्याही स्वरूपाचे रचनात्मक कार्य म्हणजे बौद्धिक संपदा आहे. ही आपल्याला दैनंदिन जीवनात विविध स्वरूपात उपयोगास येत असते तसेच ती आधुनिक काळाची गरज आहे. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेड सिक्रेट याद्वारे आपण नवनिर्मिती व संशोधनास सुरक्षित करू शकतो. परिणामी मूळ संशोधकाला त्याच लाभ होत नाही. त्यामुळे पेटंट मिळवणे अतिशय महत्त्वाचे ठरते. भारतीय पेटंटचे महत्त्व, भारतातील पेटंट फाइल्सची वर्तमान स्थिती, पेटंट हक्काचे आर्थिक महत्त्व, भारतीय पेटंट संरक्षणाची जागतिक परिस्थिती, भौगोलिक निर्दर्शन अशा विविध मुद्द्यांवर प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या २० पेटंट व २५ कॉपीराईट विक्रमाबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

काय आहेत पेटंट
AI-पॉवर्ड व्हॉइस क्लोनिंग आणि मशीन भाषांतर वापरून व्हिडिओ डब करणे, ब्लॉकचेन आधारित विकेंद्रित स्मार्ट करार शैक्षणिक प्रमाणन प्रणाली, Next.js आधारित वेबसाइट आणि कारागिरासाठी फ्लटर आधारित अर्ज, डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग आधारित वैद्यकीय निदान प्रणाली आणि पद्धत, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये ओळखल्या जाणार्‍या संसाधनांच्या कमतरतेच्या सांख्यिकीय आणि परिमाणात्मक विश्लेषणासाठी एक पद्धत उद्योजकता, डिजिटल मार्केटिंगमध्ये ऑगमेंटेड रिअॅलिटीची संकल्पना एम्बेड करण्यासाठी पद्धतशीर फ्रेमवर्क, स्मार्ट शहरांमधील वाहतूक नियंत्रणासाठी IOT आधारित आपत्कालीन हाताळणी संप्रेषण, भारतातील विविध राज्यांमध्ये दळणवळणासाठी इंग्रजी भाषेच्या महत्त्वाचे विश्लेषण, औषध वितरण प्रणालीसाठी संगणक सहाय्यित डिझाइन, बायोमेडिकल ऑटोमेशनसाठी IOT, मोल्डिंग मशीनसाठी IH, माती संरचना परस्पर विश्लेषणासाठी इंटरफेसच्या जाडीवर माती आणि संरचना पॅरामीटर्सचा प्रभाव निश्चित करण्याची पद्धत, भारतातील स्मार्ट शहरांमध्ये स्मार्ट सार्वजनिक ग्रंथालयांचा प्रभाव, IOT आधारित सोलर ट्रॅकिंग सिस्टीम, उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीसाठी कार्यक्षम पोल्ट्री हाउस डिझाइन, आयओटी आधारित ओमिक्रॉन एका कोविड-19 चाचणी बूथमध्ये उदयास आले ज्यामध्ये अभ्यागताच्या थर्मल इमेज डिटेक्शनसह सक्षम करणे, सखोल शिक्षणाचा वापर करून ऊर्जा वापराचा अंदाज आणि अलर्ट जनरेशन, स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग सिस्टमने एमएल आणि बिग डेटा अॅनालिटिक्स वापरून स्मार्ट ग्रीड सक्षम करणे, मशीन लर्निंग आणि IOT वापरून फोटोव्होल्टेइक ग्रिड्सच्या जास्तीत जास्त पॉवर पॉइंटचा मागोवा घेणे

Leave A Reply

Your email address will not be published.