रायसोनी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी रायसोनी इस्टीट्यूटचे प्रेरणास्थान स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. आकाश चौधरी यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सहकारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून रक्तदानाकरीता आवाहन केले व शिबिर कालावधीत रक्तदात्यांची आस्थेने विचारपूस करून मनोबल वाढविले.

अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी रक्तसंकलनाची प्रक्रिया विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सहकारी यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सहकाऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकूण २५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला व एकूण १५० रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले. शिबिराच्या समारोपावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. आकाश चौधरी व डॉ. दिपक पाटील यांनी महाविद्यालयास स्मृतीचिन्ह व गौरव पत्र देवून महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह व शिबिराचे सुव्यवस्थित आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. या शिबिराकरिता रायसोनी इस्टीट्यूटचे अजय चौधरी, आसिफ पिंजारी व महेंद्र ढोणे यांनी संयोजनाची भूमिका पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.