धरणगावच्या युवकाला ३ लाखांचा गंडा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पैसे गुंतविल्यास त्या बदल्यात कमिशनचे आमिष दाखवून धरणगावच्या युवकाची ३ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूर्तजा अहमद शेख इसहाक (30) हे शहरातील रा. मराठे गल्लीत राहत असून त्यांच्या मोबाईलवर टेलिग्राम अ‍ॅप आहे. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 च्या दरम्यान प्रिया नावाच्या आयडीवरून मेसेज आला व पैसे गुंतविण्याच्या आमिषानंतर त्या बदल्यात कमिशन मिळेल, असे सांगितल्यानंतर अमिषाला बळी पडून मुर्तजा यांनी अमेझॉन पे व पे टीएम अकाउंटवरून तीन लाख 10 हजार 864 रुपये पैसे पाठवले.

पैसे घेऊनसुद्धा मुर्तजा यांना कोणत्याही प्रकारचे कमिशन देण्यात आले नाही. त्यांनी 9921799488 या कस्टमर केयर मोबाईल नंबरवर फोन करून पैशांची मागणी केली परंतु याठिकाणी देखील त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच मुर्तजा यांनी धरणगाव पोलिसात टेलिग्राम अँप वरील प्रिया7187 या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.