तापसीची घायाळ अदा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेत्री तापसी पन्नूला (Taapsee Pannu) २०२१-२२ हे वर्ष पाहिजे तेवढे चांगले गेले नाही. तिचे सलग एका पाठोपाठ सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. त्यातला ‘दोबारा’ (Dobaaraa )हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला, तर ओटीटीवर प्रदर्शित झालेले ‘लुप लपेटा’,(Looop Lapeta) ‘ब्लर’ (Blurr) हे चित्रपटही फ्लॉपच्या यादीत जमा झालेत, पण आता हे नवं वर्षं तापसीसाठी लाभदायक ठरू शकतं. कारण तिचा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ (‘Phir Ai Hasin Dilruba’) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच २०२१ साली तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ (Haseen Dillruba) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अगदी हीट ठरला नसला तरी बऱ्याच लोकांना याची कथा चांगलीच आवडली होती. सस्पेन्स आणि रोमान्सचा तडका असलेल्या या चित्रपटाचा आता पुढचा भाग म्हणजेच ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतंच तापसीच्या या नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून यात ती अत्यंत बोल्ड अवतारात आपल्याला बघायला मिळत आहे. लाल रंगाची साडी आणि बॅकलेस ब्लाऊज परिधान करून तापसी पाठमोरी ताज महालसमोर (Taj Mahal) बसली आहे. याबरोबरच तिच्या हाताची बोटं रक्ताने माखली आहेत. तापसी हा पोस्टरवरचा थरकाप उडवणारा पण भुरळ पाडणारा हा बोल्ड लूक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे.

‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसीबरोबर हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि विक्रांत मॅसे (Vikrant Massey) हे प्रमुख भूमिकांमध्ये होते. आता या नवीन भागात तापसीबरोबर विक्रांत आणि सनी कौशल (Sunny Kaushal) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.