ड्रायफूट दुकानदाराची ४३ हजारात फसवणूक; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ड्रायफूट दुकानदाराला शासनाचा अधिकारी असल्याची बतावणी करून काजू, बदाम आणि गावरानी तूप प्रत्येकी वीस किलोप्रमाणे ड्रायफूटचा एकुण ४३ हजाराचा मुद्देमाल घेवून फसवूणक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील जिल्हापेठ परिसरातील रसाळ चेंबर्स लेवा बोर्डिंग समोर अजय रतनसी सोनी (वय ५८) हे वास्तव्यास आहे. याच ठिकाणी त्यांचे सोनी ड्रायफूट व जनरल स्टोअर्स नावाचे त्यांचे दुकान आहे. ६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोनी व त्यांचा भाऊ संजस रतनसी हे दोघे दुकानात असतांना कैलास फकिरा बिरारे, रा. पोखरण रोड, ठाणे या नावाचा व्यक्ती आला. शासनाचा विशेष लेखापरीक्षक असल्याचे सांगून जलाराम मंडळास काही वस्तू भेट द्यायचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पध्दतीने त्याने सोनी भावंडांचा विश्वास संपादन केला तसेच विशेष लेखापरीक्षक असल्याचे ओळखपत्रही दाखवले. ओळखपत्र पाहून सोने भावंडांचाही त्याच्यावर विश्वास बसला.

दरम्यान कैलास बिरारे याने सोनी दुकानातून २० किलो काजू, २० किलो बदाम व २० किलो गावरानी तुप खरेदी अशा पध्दतीने ४३ हजारांचा सामान खरेदी केलेा. त्याचे पक्के बिल घेतले. मात्र पैसे रोखीने न देता टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा धनादेश दिला. सोनी यांनी हा धनादेश बँकेत टाकला असता तो वटला नाही. त्यानंतर सोनी यांनी बिरारे यांना मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला मात्र पैसे मिळाले नाही. त्यानंतर सोनी यांनी ठाणे शहर गाठले. याठिकाणी बिरारे यांच्या बहिणीची भेट घेतली. मात्र बहिणीने त्याच्यासोबत माझा कुठलाच संपर्क नाही. उलट त्याने माझेच पैसे बुडवले असल्याचं सांगितलं.

त्यानंतर सोनियांनी वेळोवेळी बिरारे या संपर्क साधला काही काळानंतर बिरारे याने फोन उचलणे बंद केले. तब्बल तीन वर्षांपर्यंत पैसे मिळतील याची वाट बघितली मात्र अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर सोनी यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी होऊन बुधवार २ मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैलास फकिरा बिरारे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र बागुल हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.