महिला व्यापाऱ्याची साडे नऊ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
महिला व्यापाऱ्याकडून उधारीने माल घेऊन त्याची साडे नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील अयोध्या नगरातील अशोक नगरात मनिषा नंदकिशोर सोमाणी या वासतव्यास असून त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये कडधान्य विक्रीचा होलसेलचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून सिताराम घिसुलाल उपाध्याय प्रोप्रायटर विठ्ठल ट्रेडर्स रा. दालफळ, शिवाजी नगर, जळगव यांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून ९ लाख ७९ हजार १६९ रुपयांचा कडधान्याचा माल वेळोवेळी उधारीने खरेदी केला. तसेच त्यांना मालाचे पैसे मागितले असता त्यानी पैसे न देता तुम्हाला मार्केटमध्ये धंदा करु देणार नाही, अशी धमकी देत विश्वासघात करुन व्यापारी महिलेची फसवणुक केली. याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने यावर सुनावणी घेत एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महिलेच्या तक्रारीवरुन मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता सिताराम घिसुलाल उपाध्याय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.