दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग (व्हिडीओ)

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर येत आहे. ही आग मोठी असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवळपास 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आणि आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहे. आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्ध पातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत नेमकं कितपत नुकसान झालंय? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. आणि ही आग नेमकी कशी लागली? या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण आगीचे व्हायरल झालेले व्हिडीओ हे धडकी भरवणारे आहेत.

दिल्ली अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहिती नुसार. “आम्हाला आज दुपारी 3 वाजून 7 मिनिटांनी आयकर विभागाच्या सीआर इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही अग्निशामक दलाच्या 21 गाड्या घटनास्थळाकडे रवाना केल्या. घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि इतर कायदेशीर कामांसाठी आम्ही तातडीने तिथल्या स्थानिक पोलिसांनादेखील फोन करुन या घटेनची माहिती दिली”, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या अग्निशामक दलाकडून देण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.