भंगार गोदामात अग्नितांडव; ११ जणांचा मृत्यू

0

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज पहाटे हैदराबादच्या भोईगुडा येथे लोखंड आणि प्लास्टिकच्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ११ मृतदेह बाहेर काढले असून ते सर्व बिहारमधील स्थलांतरित मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हैदराबाद येथील सिकंदरद रेल्वे स्थानकाजवळील निवासी वसाहतीमधील दाट लोकवस्तीच्या भोईगुडा भागातीलआयडिएच कॉलनी येथील गोडाऊनच्या वरच्या मजल्यावर सुमारे १३ कामगार झोपले असताना पहाटे ४ च्या सुमारास ही आग लागली अशी माहिती मुशीराबाद पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

या आगीने संपूर्ण गोडाऊनला जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहिती स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने सकाळी ७ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.