राखी सावंतच्या पतीच्या अडचणीत वाढ; विद्यार्थ्यीनीकडून FIR दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा पती आदिल खान (Adil Khan) याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी राखी हिने पती आदिल याच्यावर मारहाण, फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ शूट करून विकल्याचे आरोप केले होते. तर दुसरीकडे आदिल खानविरोधात एका विद्यार्थ्यीनीने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यामुळे आदिल खान आणखी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रिपोर्ट्सनुसार, एका इराणी विद्यार्थ्यीनीने आदिलवर बलात्काराचे आरोप करत FIR दाखल केली आहे.

राखी सावंत हिचा पती आदिल याच्या विरोधात म्हैसूर याठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका इराणी विद्यार्थ्यीनीने आदिल खान याच्या विरोधात बलात्काराचे आरोप करत म्हैसूरच्या व्हीव्ही पूरम पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यीनी डॉक्टर ऑफ फार्मसी या विषयात शिक्षण घेत होती.तेव्हा विद्यार्थ्यीनी आणि आदिल यांची ओळख डेजर्ट लॅब फूड अड्डा याठिकाणी झाली. आदिल त्या फूड आउटलेटचा मालक होता. भेटीनंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं. तक्रारीनुसार, आदिल याने लग्नाचं आमिष देत म्हैसूर याठिकाणी एका अपार्टमेंट बलात्कार केल्याचा आरोप विद्यार्थ्यीनीने केला आहे. जेव्हा पाच महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यीनीने लग्नाची मागणी केली, तेव्हा आदिल याने लग्न करण्यास नकार दिला.

जेव्हा पीडित विद्यार्थ्यीनीने आदिल याला पोलिसांची धमकी दिली, तेव्हा आदिल याने पीडित विद्यार्थ्यीनीला इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकी दिली. राखी सावंत हिने देखील आदिलवर केले गंभीर आरोप… राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मारहाण आणि फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ बनवून विकल्याचे गंभीर आरोप देखील राखीने आदिल याच्यावर केले आहेत. त्यामुळे आदिल खान याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.