लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील फिल्मसिटी (Filmcity) दुसरीकडे स्थलांतरीत करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता योगींनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बॉलीवूड मधील अनेक दिग्गज सेलेब्रेटींनी त्यावेळी फिल्मसिटीच्या स्थलांतराऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा असे आवाहन योगींना केले होते.
तसेच प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनं (Sunil Shetty) देखील मुंबईतील फिल्मसिटीवरून योगींची भेट घेतली व त्यांना अजून नवीन काय प्रोजेक्ट हाती घेता येतील याविषयी सुचवले होते. आता योगींनी एक निर्णय घेतला आणि पुन्हा नवीन चर्चांना उधाण आले आहे. योगींनी आता उत्तर प्रदेशमध्ये येत्या सहा महिन्यात नवीन फिल्म सिटीची निर्मिती करण्याचा विचार चालू आहे. त्याच्या आराखड्याचे काम सहा महिन्यात पूर्ण होणार असून त्यासाठी एका उच्च स्थरीय समितीची निर्मिती केली आहे व त्याचे अध्यक्षस्थान योगींकडे आहे.
आम्ही नव्यानं जी फिल्म सिटीची उभारणी करत आहोत त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये विकासाची नवे धोरण उभे केले जाणार आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
उत्तर प्रदेशाची प्रतिमा बदलण्यासाठी यासारखे नवे प्रोजेक्ट महत्वाचे ठरतील. त्यामुळेच प्रशासनानं वेगानं काही धोरणं राबविण्याचे ठरवले आहे. येत्या सहा महिन्यात उत्तर प्रदेशाचे रुपडे पालटलेले दिसेल. या फिल्मसिटीच्या निमित्तानं केवळ भारतच नाहीतर जगभरातील वेगवेगळ्या दिग्गज सेलिब्रेटींना त्यांच्या कलाविष्काराचे प्रदर्शन करण्याची यानिमित्तानं संधी मिळणार आहे. तसेच राज्यातील कलाकारांसाठी देखील हा प्रोजेक्ट महत्वाचा ठरणार आहे.