प्रवाशांना दिलासा.. उत्सव विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.  प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने मुंबई ते रीवा आणि पुणे ते जबलपूर, जबलपूर ते कोइम्बतूर दरम्यान धावणाऱ्या उत्सव स्पेशल ट्रेन सेवेचा कालावधी पुढीलप्रमाणे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

1) पुणे-जबलपूर स्पेशल

02131 पुणे-जबलपूर सुपरफास्ट स्पेशल दर सोमवारी  दिनांक 27.11.2023 पर्यंत अधिसूचित करण्यात आले होते, जे आता 01.01.2024 पर्यंत वाढविण्यात आले आहे.

02132 जबलपूर-पुणे सुपरफास्ट स्पेशल दर रविवारी  दिनांक 26.11.2023 पर्यंत धावण्यासाठी अधिसूचित करण्यात आले होते,  आता 31.12.2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

२) मुंबई-रेवा स्पेशल

02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रीवा सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक शुक्रवारी दिनांक 01.12.2023 पर्यंत अधिसूचित करण्यात आले होते, जे आता दिनांक 29.12.2023 पर्यंत वाढविण्यात आले आहे.

02187 रेवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल दर गुरुवारी दिनांक 30.11.2023 पर्यंत अधिसूचित करण्यात आले होते, जी आता दिनांक 28.12.2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

3) जबलपूर-कोइम्बतूर स्पेशल

02198 जबलपूर-कोइम्बतूर स्पेशल दर शुक्रवारी दिनांक 24.11.2023 पर्यंत   अधिसूचित करण्यात आले होते, जे आता दिनांक 29.12.2023 पर्यंत वाढविण्यात आले आहे.

02197 कोईबामतूर- जबलपूर स्पेशल दर सोमवारी  दिनांक 27.11.2023 पर्यंत  अधिसूचित करण्यात आले होते, जे आता दिनांक 01.01.2024 पर्यंत वाढविण्यात आले आहे.

 

विशेष गाड्यांचा दिवस, वेळ, रचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही. या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी http://www.enquiry ला भेट द्या. http://Indianrail.gov.in वर तपासा किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

,

Leave A Reply

Your email address will not be published.