‘फॅशन’ आणि ‘फॅशन सेन्स’ समजून घेतांना…!

0

लोकशाही विशेष लेख

 

माणूस म्हटला म्हणजे त्याच्या सवयी आणि गरजा तर आल्याच.. अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत, आणि अशाच एका त्याच्या महत्वाच्या गरजेपैकी एक गरज म्हणजे कपडे.. अलीकडच्या काळात कपडे म्हटले की डोक्यात येणारा पहिला विचार म्हणजे ‘फॅशन’ (Fashion)… मग या फॅशनमध्ये रंगीबिरंगी कपडे, त्यावर नवनवीन ॲक्सेसरीज, चप्पल या सगळ्या गोष्टींना एकत्रितपणे मॅचिंग करून परिधान करणं हे सगळं आलंच.. यालाच हल्ली फाधन सेन्स म्हणतात.

सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना खूप नवनवीन गोष्टी अनुभवायला, बघायला आणि शिकायला मिळतात. आजकालची युथ नवनवीन गोष्टी इंस्टाग्रामवर बघत असते. मग त्यात इन्फ्लुअन्सर (Influencer) असू देत किंवा फॅशन ब्लॉगर (Fashion blogger) असू देत. त्यांनी कसे कपडे घातले, ते कसे राहताय, त्यांची लाईफस्टाईल काय, या सगळ्याचं ते एकत्रितपणे त्यांच्या आयुष्यात अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशात या सगळ्या गोष्टी करत असताना कळत किंवा नकळतपणे विसरत जातात ते आपलं अस्तित्व…

असं म्हटलं जातं जो माणूस जसा कपडे परिधान करतो त्यातून त्याचा प्रतिबिंब प्रस्थापित होतो

“style is a way to say who you are without having to speak” – Bachel Zoe.

या तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असताना सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्स, यांचं अनुकरण करून त्या पद्धतीने किंवा त्या शैलीमध्ये स्वतःला ढाळून घेणं म्हणजे फॅशन नव्हे. सिनेमा सेलिब्रिटीज, राजकीय किंवा आर्थिक अशा कारणांमुळे फॅशन ट्रेंड प्रभावित होतात. हे ट्रेड रोज बदलतात ते अपरिवर्तित राहू शकत नाही.

या सगळ्या फॅशनचा ट्रेंड फॉलो करत असताना आपण कधी हा विचार नाही करत की, हे सगळे ट्रेन्स किंवा ही पाश्चात्य पद्धतीची फॅशन याचा उगम कुठून झाला. जेम्स लेवर आणि फर्नांड ब्रूडेल यांच्यासह इतिहासकारांनी 14 व्या शतकाच्या मध्यात कपड्यांची पाश्चात्य फॅशन सुरू केले. त्यानंतर ‘फॅशन कॅपिटल्स’ म्हणून अनेक शहर प्रख्यात झाली. पण त्यापैकी काही महत्त्वाची ‘फॅशन कॅपिटल्स’ (Fashion Capitals) नावानीशी ओळखले जाणारे म्हणजे पॅरिस, मिलान, न्यूयॉर्क, लंडन ही शहरं आहेत.

ही पाश्चात्य फॅशन सुरू झाल्यानंतर अजून एक ट्रेंड सुरू झाला. जिथे महिलाही पुरुषांचे कपडे परिधान करू लागल्या. ज्याला आजकालच्या मॉडर्न भाषेत आपण ‘ओवर साईज कपडे’ किंवा ‘gen-z’ असंही म्हणतो. या युनी सेक्स ड्रेसिंग ची सुरुवात 1960 च्या दशकात पियरे कार्डिन आणि रुडी गर्नरिच यांनी केली.

एखाद्या पिक्चर मध्ये किंवा एखाद्या सेलिब्रिटीला बघून किंवा सोशल मीडियावर सुरू असलेल्या फॅशन ट्रेन्सला बघून मग अफाट प्रयत्न करून त्यांचं अनुकरण करणं आणि मग एवढ्या अफाट प्रयत्नानंतर या इन्फ्लुएन्सर समाजात स्वतःचं अस्तित्व शोधण्याची सुरू झालेली धडपड, यालाच आजची युथ किंवा जनरेशन ‘फॅशन’ असे म्हणते. पण या सगळ्या धडपडी मध्ये आपण मुळात कोण आहोत? आणि आपल्याला एका विशिष्ट शैलीचे कपडे घालायला आवडतात का? की आपण ती फक्त एक फॅशन ट्रेंड फॉलो करायचाय म्हणून घालतोय? या सगळ्यांचाही विचार फाधन करतांना गरजेचा ठरतो.

फॅशन ट्रेंड्स फॉलो करणं चुकीचं नाहीच. पण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून फक्त या समाजात वावरण्यासाठी हे फॅशन ट्रेंड फॉलो करताय, तर हो… हे नक्कीच चुकीचं आहे.. या सगळ्या गोष्टी समोर येतात पण याचा विचार मात्र कोणी करत नाही. मुळात फॅशन म्हणजे काय, तर “आपल्या शरीराला, आपल्याला एका विशिष्ट शैलीचे कपडे परिधान करायला आवडतात किंवा ते आपल्याला उठून दिसतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे परिधान केलेल्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी न होता तो द्विगुणित होतो, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून एका विशिष्ट शैलीचे रंगाचे कपडे परिधान करणे यालाच मुळात फॅशन असे म्हणतात.”

Fashion is a manner of living

फॅशन ही आपल्या जगण्याच्या पद्धती मधली एक खूप महत्त्वाची शैली आहे, जिला आपण जोपासायला हवी. पण ती शैली जोपासताना मात्र ‘आपलं मूळ काय आहे’ हे विसरता कामा नये.

आजच्या या पिढीला फक्त एवढंच सांगेल, ‘बदलत्या काळानुसार तुमची जीवनशैली नक्कीच बदलली आहे. आणि त्यात बदल करून घेणं ही सुद्धा काळाची गरज आहे. पण या रिल्स आणि ट्रेंड्सच्या जगात समाविष्ट होण्याआधी एक प्रखर व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि या समाजासाठी काय चांगलं करू शकता, याचा विचार करावा. या विचाराच्या शेवटी तुम्हाला तुमचं मूळ सापडेल, आणि त्या मुळातूनच तुम्हाला तुमचा फॅशनही सापडेल…!

साक्षी पाटील
पाचोरा

Leave A Reply

Your email address will not be published.