मोबाईलचा अतिवापर मुलांना बनवतोय मानसिक रोगी !

0

लोकशाही विशेष लेख

आजकाल बालपणातील मुलांमधे बदलत्या काळात मोबाइल फोनचा अतिवापर वाढताना दिसत आहे. एकीकडे मोबाइलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण (Digital Education) तर दुसरीकडे बदलते जग. विसाव्या शतकाआधीचे शिक्षण आणि बदलत्या काळानुरूप एकविसाव्या शतकाचे शिक्षण यात सर्वात मोठा फरक म्हणजे डिजिटल जग. अँड्रॉइड मोबाइल फोन बालपणातील मुलांच्या शिक्षण, मनोरंजन आणि संपर्कासाठी एक महत्त्वाचे साधन झपाट्याने होताना दिसत आहे. याचे जवळच्या काळातले उदाहरण म्हणजे कारोना काळात विद्यार्थ्यांना दिले जाणारे ऑनलाईन शिक्षण.

शाळा, महाविद्यालय बंद असल्यानं मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. बाहेरचे खेळ बंद झाल्यानं अगदी लहान मुलंही तासनतास मोबाईलवर खेळू लागले. कार्टून्स, गेम्स, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशा मनोरंजनाच्या नवीन साधनांची मुलांना सवय लागली, परंतु याचा वापर मर्यादेतच करणे आवश्यक असते. मोबाईलचा अतीवापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या तसेच बालकांच्या मनावर आणि आरोग्यावर होत असतो.

मुलांना मोबाइल वापरण्यापेक्षा पहिले त्यांना जीवनातील इतर गोष्टी शिकवणे आवश्यक आहे. मोबाईल फोन वापरणे चुकीचे नाही; परंतु त्यांचा वापर नियंत्रित करण्याची गरज आजच्या काळात आहे. मोबाइल फोन वापरण्यापेक्षा मुलांना आवडी नुसार शिक्षण घेण्याची, शिकण्याची, स्वातंत्र्य आणि जीवनाची इतर स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची गरज आहे.

बालकांना मोबाइल फोन वापरण्याचे जसे फायद्यांचे आहे तसेच अनेक दुष्परिणाम सुद्धा आहे.

आरोग्य

मोबाइल फोन अतिवापरामुळे मुलांना झोपेची समस्या जाणवते.या साधनाचा वापर आपण कितीवेळ आणि कशा पद्धतीने करावा ही विशेष बाब पालकांना शिकवण्याची गरज असते. तसेच, मोबाइल फोन वापरण्याच्या कारणांमुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ शकतात.

अध्ययन

मोबाइल फोन वापराच्या माध्यमातून मुलांना एकाधिक निश्चित वेळा व्यर्थ करायच्या शक्यता आहे जे शिक्षणासाठी अत्यंत गंभीर असते. अतिरिक्त, मोबाइल फोनचा वापर अतिरिक्त दुष्परिणाम सोडताना दाखवू शकतो, जसे कि असंभव आणि अयोग्य सामग्री प्रवेश आणि सोशल मीडिया वापर.

थकवा, ताण वाढणे

त्यांना मोबाईलच आपले जग वाटू लागते. मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. काही प्रकरणात तर अनेकांना मानसिक आजार सुद्धा निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा धोका ओळखून पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणाव्यात एखाद लहान मूल/बाळ रडत असेल आणि पालकांना काही काम असेल तर त्याला तेच पालक मोबाईल मधे कार्टून किंवा गेम लावून देतात हीच सवय त्यांना लागून पुढे घातक ठरते तसेच काही पालक आपल्या लहानशा बाळांना त्याने जेवण करावे त्यासाठी मोबाईल देतात परंतु हीच सवय त्याला पुढच्या वेळेस सुद्धा लागते.

स्वतंत्रता

मोबाइल फोन शिक्षणाच्या बाबतीत वापरन्यासाठी उत्तम साधन आहे तेवढे स्वातंत्र्य असायलाच हवी परंतु ते कितीप्रामाणात, याला सुद्धा मर्यादा हव्यात. मोबाईल फोनचा अतिरिक्त वापरामुळे मुले/बालक मानसिक रोगी बनत चालले आहेत त्यांच्यामध्ये अक्कल कोंडेपणाचा परिणाम दिसून येतो आहे अधिक काळ मोबाईल घेऊन बसून बघितल्यामुळे पाठीत दुखणे,डोळ्यांवर ताण येऊन डोळ्याची दृष्टी कमजोर होत जाण्याची शक्यता ही तेवढीच आहे. कोणत्याही गोष्टीचा अती वापर नको,मग ती कोणत्याही गोष्टीशी निगडित असो. मोबाईलच्या अश्या अती वापरामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या, शैक्षणिक समस्या आणि सामाजिक आणि मानसिक समस्या उत्पन्न होत आहेत.

इत्यादी वरील सर्व बाबी केवळ मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होत असून यावर लवकरात लवकर आवर घालणे पालकांना गरजेचे आहे अन्यथा भविष्यामध्ये मुलांमध्ये विविध प्रकारचे विकार आपणास पाहायला मिळतील ही समस्या सध्या सोपी वाटत असली तरी तिचे परिणाम भविष्यामध्ये मात्र फार भयानक आहे याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मूर्खताच समजली जाईल. या लेखातून फक्त एवढच की आपल्या बालकांमधे मोबाईल वापर जास्त प्रमाणात नको, हे काळ डिजिटल जरी असेल तरी मोबाईल वापर फक्त आणि फक्त मर्यादेतच असायला हवे तसेच त्यात सातत्यता नको.

इकबाल पिंजारी
लोकशाही ऐनपूर प्रतिनिधी
मो क्र : 9881969679

Leave A Reply

Your email address will not be published.